सिल्लोड, (प्रतिनिधी) : तहसील कार्यालयासमोर आठ दिवसांपासून मंगेश साबळे यांचे उपोषण सोमवारी मंत्री अतुल सावे यांच्या आश्वासनानंतर सोडले. साबळे यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. हे उपोषण सुटल्याने त्यांचे सहकाऱ्यांनीही सुटकेचा निश्वास टाकला.
परंतु, अतिवृष्टीच्या पावसाने सारे काही हिरावून नेले. या शेतकऱ्यांना शासनाने हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी. यासह शेतकऱ्यांच्या हिताच्या इतर मागण्या घेऊन फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा येथील सरपंच मंगेश साबळे यांनी आठ दिवसांपूर्वी सिल्लोड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते.
दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत चालली होती. दुपारनंतर मंत्री अतुल सावे हे उपोषण स्थळी आले. त्यांनी साबळे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा यांच्या सूचनेनुसार आपले उपोषण सोडविण्यासाठी आलो आहे. तुमच्या मागण्यासंदर्भात मी स्वतः मुख्यमंत्री यांच्यांशी चर्चा करून या सोडविण्यासाठी आग्रह धरेल, मी शब्दाला जागणारा नेता आहे. मंत्री अतुल सावे यांचे हातून लिंबू सरबत घेऊन उपोषणाची सांगता झाली.